वैदकीय प्रवेशासाठी 59 हजार 276 विद्यार्थ्यांचे अर्ज

वैदकीय प्रवेशासाठी 59 हजार 276 विद्यार्थ्यांचे अर्ज

मुंबई - वैद्यकीय प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज करण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी संपली. या मुदतीपर्यंत 69 हजार 576 विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, यापैकी 59 हजार 276 विद्यार्थ्यांनी अर्जाचे शुल्क भरले आहे. यात मुंबईतील विद्यार्थ्यांची 5,803 संख्या अधिक आहे, तर सर्वांत कमी 285 अर्ज गडचिरोलीतून दाखल झाले आहेत. यासह प्रवेशाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून प्रवेशासाठी उपलब्ध जागा 30 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना पाच जुलैपर्यंत ऑनलाईन पसंतीक्रम भरता येईल.

एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला 22 जूनपासून सुरवात झाली आहे. मात्र आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याने ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत एक दिवसाने वाढविण्यात आली होती. राज्यभरातून तब्बल 69 हजार 576 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. यातील 61 हजार 645 विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज निश्‍चित केले आहेत. त्यातील 59 हजार 276 जणांनी प्रवेशाचे शुल्क भरले आहेत. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतून सर्वाधिक पाच हजार 803 अर्ज दाखल झाले आहेत. त्याखालोखाल पुण्यातून 5,384, नागपूर 3,964, नगर 3,733, ठाणे 3,445 या जिल्ह्यांतून अर्ज आले आहेत. गडचिरोलीमधून सर्वांत कमी अर्ज 285 दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर उस्मानाबाद 313 व सिंधुदुर्गातून 361 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
एमबीबीएस, बीडीएसच्या विद्यार्थ्यांची चार जुलैपर्यंत कागदपत्रांची पडताळणी होईल. चार जुलैला पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. पाच जुलैपर्यंत पसंतीक्रम ऑनलाईन भरायचा आहे. त्यानंतर एमबीबीएस, बीडीएसची पहिली यादी सहा जुलैला रात्री आठ वाजता जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे बीएएमएस, बीएचएमएस व बीयूएमएस या अभ्यासक्रमांच्या जागांची यादी पाच जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.

Web Title: 58000 Student Form for Medical Admission Education
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com