नगरसेवकांना महापालिकेत पोहचण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रस्ता वापरण्याची परवानगी द्यावी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 जानेवारी 2019

मुंबई - वाहनांच्या कर्णकर्कष हॉर्नमुळे प्राण्यांना आणि पक्ष्यांना त्रास झाला, तरी चालेल; वाहतूक कोंडीचा त्रास मात्र नगरसेवकांना सहन होत नाहिये. पश्‍चिम उपनगरात मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नगरसेवकांना महापालिकेत पोहचण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा रस्ता वापरण्याची परवानगी हवी आहे. शिवसेनेच्या नगरसेविका रिद्धी खुरसुंगे यांनी हा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. 

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय उद्यानात झालेल्या एका कार्यक्रमात भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी पश्‍चिम उपनगरात वाहतूक कोंडी होत असल्याने मंत्रालयात पोहचण्यासाठी राष्ट्रीय उद्यानातून रस्ता तयार करण्याची मागणी केली होती.  

पश्‍चिम उपनगरात मेट्रो रेल्वेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. दहिसरमधून कुलाबा फोर्टला वर्दळीच्या वेळी पोहचण्यासाठी तीन ते चार तासांचा वेळ लागत आहे. नगरसेवकांना विविध बैठका, समिती सभांसाठी महापालिकेच्या मुख्यालयात जावे लागते. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानातील रस्ता वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खुरसुंगे यांनी केली आहे.

सामान्य नागरिकही वाहतूक कोंडीतून प्रवास करत आहेत. नगरसेवकांना राष्ट्रीय उद्यानातून वाहने घेऊन जाण्याची परवानगी दिल्यास सर्वच जण अशी परवानगी मागतील. अशी वाहतूक परिसंस्थेला मारक ठरू शकते. प्राण्यांनाही त्याचा त्रास होईल, त्यामुळे ही परवानगी दिली जाऊ नये.
- डेबी गोयंका, पर्यावरण अभ्यासक

Web Title: Allow corporators to use road in Sanjay Gandhi National Park to reach Municipal Corporation - Riddhi Khursung

संबंधित बातम्या

Saam TV Live