काय झाले चिमुरड्याला कारखाली चिरडणाऱ्या महिलेचे?
कारखाली येऊन आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलाच्या अंगावरुन गाडी नेणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
श्रद्धा चंद्राकर आणि गाडीखाली आलेला मुलगा,गोरेगावमधील दिंडोशी भागातल्या सद्गुरु कॉम्प्लेक्समध्ये राहतात. 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास चंद्राकर यांच्या निष्काळजीपणामुळे लहान मुलगा गाडीखाली आला होता.

मोटर वाहन कायद्यातील कलम 337 आणि 134 नुसार बेदरकारपणे गाडी चालवणे आणि पोलिसांपासून अपघाताची माहिती लपवून ठेवणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अजामीनपात्र गुन्ह्याप्रकरणी आरोपी श्रद्धा चंद्रारकरला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.