मुख्यमंत्र्यांची प्रकृती खालावली; विदर्भ दौरा रद्द करुन मुख्यमंत्री मुंबईत

मुख्यमंत्र्यांची प्रकृती खालावली; विदर्भ दौरा रद्द करुन मुख्यमंत्री मुंबईत

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती अचानकपणे बिघडल्याने त्यांनी विदर्भातील दौरा अर्धवट सोडून मुंबईला परत गेले. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्री फडणवीस आज औरंगाबादहून वाशिम येथील कार्यक्रमाला जात होते. यावेळी सिंदखेडराजा येथे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते तातडीने औरंगाबाद येथे गेले. औरंगाबाद येथे उपचार घेतल्याने हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री मुंबईला पोहोचले आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाशिम जिल्ह्यात झालेल्या 300 कोटी रुपयांच्या कामाचे लोकार्पण आणि नवीन 600 कोटींच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशिम मध्ये येणार होते. मात्र बुलडाणा येथील कार्यक्रम संपल्यानंतर त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने मुख्यमंत्री आले नाहीत. त्यामुळं पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री रणजित पाटील, आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. वाशिम येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री येणार नाहीत, याची माहिती मिळताच धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पिवळ्या रंगाचे रुमाल भिरकावून गोंधळ केला. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले.

Web Title: Health issues forced CM Devendra Fadnavis to abort Washim tour

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com