भविष्यात 'काँग्रेस - राष्ट्रवादी' एकत्र असणे आवश्‍यक

भविष्यात 'काँग्रेस - राष्ट्रवादी' एकत्र असणे आवश्‍यक

मुंबई - ‘लोकसभा निवडणुका वेगळ्या मुद्यांवर होत्या. राज्यातील निवडणुका या दुष्काळ तसेच फडणवीस सरकारच्या कामगिरीशी निगडित असल्याने त्यांचे निकाल वेगळे असतील,’ असा विश्‍वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. भविष्यात काँग्रेस - राष्ट्रवादीने एकत्र असणे आवश्‍यक असल्याचे मत मांडण्यात आले.

राज्याचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने गुरुवारी बैठक आयोजित केली होती. वंचित बहुजन आघाडी आपल्यासमवेत येणार नाही हे, लक्षात घ्या असे मत नेत्यांनी या वेळी व्यक्‍त केले. राष्ट्रवादी काँग्रेससमवेत आपली आघाडी कायम असेल हे गृहीत धरतानाच काही तक्रारींचा पाढाही या वेळी वाचण्यात आला. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे नेते उपस्थित होते.
 

Web Title: Congress and NCP must be together in the Legislative Assembly

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com