लोकसभेत काँग्रेसची दयनीय कामगिरी, प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 मे 2019

मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कामगिरी अत्यंत दयनीय झाल्याने आगामी विधानसभेच्या तोंडावर पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सामाजिक व प्रादेशिक समीकरण हे बदल होतील, अशी चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा विचार पक्षश्रेष्ठी करत आहेत. यामध्ये बाळासाहेब थोरात, राजीव सातव, नाना पटोले, विजय वडेट्‌टीवार, वर्षा गायकवाड यांसारख्या आक्रमक चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत.

राज्यात काँग्रेसकडे नेते असले तरी जनमानसावर छाप पडेल असे आक्रमक चेहरे नाहीत. त्यामुळे आक्रमक नव्या चेहऱ्यांना थेट प्रदेशाध्यक्षपदाची संधी द्यावी, अशी चर्चा पक्षात सुरू झाली आहे. 

बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातली गटबाजी निवडणुकीच्या मैदानातच उघड झाली. राधाकृष्ण विखे लवकरच भाजपमधे प्रवेश करणार असल्याची शक्‍यता असून विरोधी पक्षनेते व प्रदेशाध्यक्षपदासाठीही थोरात यांचे नाव चर्चेत आहे. 

नागपूर लोकसभेत नितीन गडकरी यांच्याशी लढत देणारे नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद द्यावे, असाही सूर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.

पटोले हे आक्रमक राजकारणी म्हणून परिचित आहेत. ते विदर्भातील असल्याने काँग्रेसचा जनाधार विदर्भात वाढण्यासाठी मदत होईल अशी अटकळ बांधली जात आहे. विजय वडेट्‌टीवार हेदेखील आक्रमक असून अखेरच्या अधिवेशनासाठी त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद देण्याचाही विचार पक्षात सुरू असल्याचे समजते. दलित नेत्या वर्षा गायकवाड यांचेही नाव विरोधी पक्षनेते अथवा मुंबई अध्यक्षपदासाठी समोर आले आहे. 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा पराभव झाला. राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांचाही पराभव झाला. राज्य काँग्रेसमधील नेत्यांमध्ये कमालीचे मतभेद आहेत. मुंबई काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण लागले आहे.

Web Title: Congress State President Changes Politics

संबंधित बातम्या

Saam TV Live