धनगर समाजाच्या आरक्षणावरून विधान परिषदेत गोंधळ

धनगर समाजाच्या आरक्षणावरून विधान परिषदेत गोंधळ

मुंबई - सत्ताधारी पक्ष धनगर समाजाला आरक्षणाच्या नावाखाली केवळ गाजर दाखवीत असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. धनगर आरक्षणावर पाच वर्षे सरकारला काहीही करता आले नसल्याने सरकारला त्यावर उत्तरही द्यायचे नसल्याने सत्ताधाऱ्यांनीच सभागृहात गोंधळ सुरू केला आहे का, असा सवाल उपस्थित करीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज आरोप केला.

धनगर समाजाच्या आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र मिळून केलेल्या अभूतपूर्व गोंधळात विधान परिषदेचे कामकाज आज पाच वेळा बंद पडले. धनगरांबरोबर मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर ताशेरे ओढल्याने परिषदेच्या सभागृहात घोषणांचा कलगीतुरा रंगला होता. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे गाजर दाखविले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला; त्याला सत्ताधारी पक्षाकडून, १४ मराठा मुख्यमंत्री झाले. पण, मराठा समाजास आरक्षण फडणवीस सरकारनेच दिले, अशा शब्दात विरोधकांना चोख उत्तर देण्यात आले.

या चर्चेत भाग घेताना धनंजय मुंडे म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षणावर पाच वर्षे सरकारला काही निर्णय करता आले नाही. सरकारने उत्तरही देऊ नये, यासाठी हा गोंधळ सुरू आहे का? धनगर आरक्षणाचा टाटा इन्स्टिट्यूटने तयार केलेला अहवाल दोन्ही सभागृहांत सादर करण्याची मागणीही धनंजय मुंडे यांनी केली. आरक्षणासारख्या संवेदशनील विषयाबाबत धनगर समाजाला गृहीत धरले जात असल्याचा टोलाही मुंडे यांनी हाणला. दरम्यान, धनगर समाजाच्या आरक्षणावर ५० मिनिटांची चर्चा विरोधी पक्षाचे रामहरी रुपनवर, भाई जगताप, डॉ. सुधीर तांबे आदींनी मांडली होती. ही चर्चा सुरू होण्यापूर्वीच भाजपचे आ. प्रवीण दरेकर यांनी शताब्दी रुग्णालयात रक्‍ताचा तुटवडा या विषयावर अगोदर चर्चा घेण्याचा आग्रह लावून धरला. मात्र, राष्ट्रवादीचे आ. रामराव वडकुते यांनी त्याला तीव्र आक्षेप घेत धनगर समाजाचा कार्यक्रम पत्रिकेवरच विषय घेण्याची मागणी केली. तालिका सभापती हुस्नबानो खलिफे यांनी धनगर आरक्षणाच्या विषयावरच्या चर्चेला परवानगी दिल्यानंतर रामहरी रुपनवर, रामराव वडकुते आणि डॉ. सुधीर तांबे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला.

Web Title: Dhangar Reservation Ruling Party Dhananjay Munde Confusion Politics

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com