मतदानाआधीच्या ४८ तासांत सोशल मीडियावरुन कोणतीही राजकीय जाहीरात प्रसिद्ध होता कामा नये -  मुंबई हायकोर्ट

मतदानाआधीच्या  ४८ तासांत सोशल मीडियावरुन कोणतीही राजकीय जाहीरात प्रसिद्ध होता कामा नये -  मुंबई हायकोर्ट

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने राजकीय पक्षांसाठी महत्त्वपूर्ण आदेश दिलेत. आता प्रत्यक्ष मतदानाआधी ४८ तासांत सोशल मीडियावरुन कोणतीही राजकीय जाहीरात प्रसिद्ध होता कामा नये, असं कोर्टाने निवडणूक आयोगाला बजावलंय. कडक अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला तशा सूचना द्याव्यात असा आदेशही कोर्टाने दिलाय.

126 कलमांतर्गतजनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. या कलमानुसार, मतदानापूर्वी ४८ तास हा ब्लॅक आऊट पिरिअड असतो. या काळात राजकीय नेत्यांना कोणतीही जनसभा, निवडणूक प्रचार तसंच निवडणुकीसंदर्भातील कोणतंही प्रदर्शन करण्यास प्रतिबंध घालण्यात आलाय.

फेसबुक, ट्टिवटर आणि इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍपसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर अशा प्रकारचा कोणताही मजकूर प्रसिद्ध होता कामा नयं असे याचिकेत म्हटलं गेलंय. 

WebTitle : marathi news mumbai high court gives code of conduct for social media ads before 48 hours of election  

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com