पेपर अवघड गेल्यामुळे एका प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरची आत्महत्या

पेपर अवघड गेल्यामुळे एका प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरची आत्महत्या

मुंबई - वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगमुळे नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉ. पायल तडवीने (26) आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच परळ येथील केईएम रुग्णालयातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरने जीवन संपवल्याची घटना सोमवारी पहाटे उघड झाली.

ओंकार महेश ठाकूर (21) असे त्याचे नाव आहे. ओंकार आई-वडिलांसह दादर पश्‍चिमेकडील कोहिनूर टॉवरमध्ये राहत होता. तो केईएम हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपीच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. सध्या त्याची परीक्षा सुरू होती. एक पेपर अवघड गेल्याने तो नैराश्‍यात होता.

त्यातूनच ओंकारने आज पहाटे तो राहात असलेल्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली. इमारतीचा सुरक्षारक्षक; तसेच आजूबाजूच्या लोकांनी त्याला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. दरम्यान, त्याच्या आत्महत्येशी सध्या सुरू असलेल्या डॉक्‍टरांच्या संपाचा किंवा रॅगिंगचा काही संबंध आहे का, या दृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत.


Web Title: KEM Hospital Trainee Doctor Suicide Crime

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com