मुंबईची लाइफलाईन 16 तासानंतर रेल्वे रुळावर

मुंबईची लाइफलाईन 16 तासानंतर रेल्वे रुळावर

मुंबई : सोमवारी रात्रीपासून ठप्प असेलेली मध्य, हार्बर लोकल तब्ब्ल 16 तासानंतर रेल्वे रुळावर आली. मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द स्टेशनदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकारांनी दिली. तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. 

कुर्ला, घाटकोपर, वडाळा या स्टेशनांजवळ ट्रॅकवर पाणी साचल्याने दोन्ही मार्गावरील सेवा मध्यरात्रीच्या सुमारास पूर्णपणे ठप्प झाली. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक लोकल ट्रॅकवर थांबून होत्या. त्यामुळे या लोकलमधील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मात्र पावसामुळे  मुंबईहून बाहेर गावी जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या लांबपल्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दुहेरी समस्यांना समोर जावे लागले आहे.

WebTitle :  marathi news mumbai lifeline local railways back on track after sixteen long hours 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com