ऑनलाईन तिकीटांमध्ये होणारी लूट आता तरी थांबणार?

ऑनलाईन तिकीटांमध्ये होणारी लूट आता तरी थांबणार?

मुंबई : कोणत्याही चित्रपटाचे किंवा नाटकाचे तिकीट बूक करण्यासाठी आता 'बुक माय शो'चा वापर आपण सहजरित्या करतो. थिएटरवर जाऊन तिकीट काढण्यापेक्षा हा मार्ग सोपा असल्याने अधिक पैसे घालवून आपण तिकीट काढतो. हे अधिकचे पैसे इंटरनेट हँडलिंग चार्जेस म्हणून आकारले जातात. पण हे हँडलिंग चार्जेस आकारण्याचा अधिकार चित्रपट तिकीटांचे बुकींग करणाऱ्या प्लॅटफॉर्मसाठी नाहीत, असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देले आहे.

'फोरम अगेन्स्ट करप्शन'चे अध्यक्ष विजय गोपाल यांनी याविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवली आहे. बुक माय शो व पीव्हीआरविरोधात गोपाल यांनी ही तक्रार केली आहे. माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त फी आकारणं हे आरबीआयच्या व्यापारी सवलत दराच्या (Merchant Discount Rate) नियमांचं उल्लंघन असल्याचं सांगितले.

एखाद्या चित्रपटाचे तिकीट 250 रूपये असल्यास हँडलिंग चार्जेसमळे हे तिकीट 280 ते 285 रूपये इतके पडते. यात ग्राहकांचे नुकसान होते. तिकीट बुकिंग अॅप्सच नव्हे, तर ऑनलाईन फूड डिलीव्हरी, कॅब्स सर्व्हिस अॅप्सही असे इंटरनेट हँडलिंग चार्जेस आकारतात, असे गोपाल यांनी सांगितले. याबाबत पुढील सुनावणी 23 मार्चला होईल. 

Web Title: online booking apps not have Authority To Charge Internet Handling Fee

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com