डॉ पायल तडवी प्रकरणातील व्हिडिओ रेकॉर्डिंग सुनावणी लांबणीवर 

डॉ पायल तडवी प्रकरणातील व्हिडिओ रेकॉर्डिंग सुनावणी लांबणीवर 

मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तीन आरोपी महिला डॉक्‍टरांच्या जामीन अर्जावरील व्हिडिओ रेकॉर्डिंग सुनावणी सोमवारी तांत्रिक कारणामुळे होऊ शकली नाही. बुधवारपर्यंत (ता. 19) सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग लांबत असेल, तर जामीन मंजूर करा, अशी मागणी आरोपींच्या वतीने करण्यात आली. गुन्हे शाखेच्या वतीने जामिनाला विरोध करण्यात आला आहे.

डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिन्ही आरोपींनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. आरोपींवर ऍट्रॉसिटीचा आरोप असल्यामुळे जामिनाची सुनावणी व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये करण्याची मागणी तडवी कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीला न्यायालयाने संमती दिली आहे. मात्र, सोमवारी तांत्रिक कारणामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध झाले नाही.

त्यामुळे जामिनावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. खटल्याची सुनावणी व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये करा. जामिनाच्या सुनावणीसाठी त्याची आवश्‍यकता नाही आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे सुनावणी लांबत असेल, तर आरोपींना जामीन मंजूर करा, अशी मागणी आरोपींच्या वतीने करण्यात आली.

न्यायालयाने सर्व आरोपींना 21 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. नायर रुग्णालयात काम करणाऱ्या डॉ. पायलने आरोपींच्या छळाला कंटाळून वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. रॅगिंग आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

Web Title: Payal Tadvi Suicide Case Video Recording Court Result

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com