'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचा मुहूर्त अखेर ठरला

'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचा मुहूर्त अखेर ठरला

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचा मुहूर्त अखेर ठरला असून हा चित्रपट आता 24 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 5 एप्रिल 2019 ठरवण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव या चित्रपटाचे प्रदर्शन 11 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान असल्याने निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली होती निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांची ही मागणी मान्य करत, लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करावा असे आदेश दिग्दर्शकांना दिले होते.

लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यातील मतदानाचे निकाल 23 एप्रिलला जाहीर होणार आहेत. हे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 एप्रिलला नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाचे प्रोड्यूसर संदीप सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

दरम्यान, ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका अभिनेता विवेक ऑबेरॉय साकारणार आहे. या चित्रपटाची टॅगलाईन ‘देशभक्ती ही मेरी शक्ती’ अशी आहे. नरेंद्र मोदींचा बायोपिक असणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर 23 भाषांमध्ये रिलीज करण्यात आलं आहे. उमर कपूर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटातून मोदी यांच्या एक भाऊ, पुत्र, सेवक, नेता, योगी अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: PM Narendra Modi Biopic will release on 24th May
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com