दानवेंनंतर प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात ?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 मे 2019

मुंबई : भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मोदी सरकारच्या कॅबिनेट मंत्रिपदी स्थान देण्यात आले आहे. तसेच रावसाहेब दानवे यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळही संपला आहे.  त्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्रातून सात नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. यामध्ये रावसाहेब दानवे यांच्यासह शिवसेनेच्या अरविंद सावंत, संजय धोत्रे, पियूष गोयल, रामदास आठवले, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे आता रावसाहेब दानवे यांचा कॅबिनेटमध्ये समावेश होत असल्याने पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित होत आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या पदावरची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. 

याशिवाय मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पदाचा कार्यकाळही संपत आहे. दानवे-शेलार या दोन्ही नेत्यांची दोन टर्म पूर्ण झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह मुंबई भाजपचा अध्यक्ष कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विनोद तावडेंना मिळणार संधी?

भाजप नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. 

Web Title: Vinod Tawde is in Race for BJP President of Maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live