मुसळधार पाऊस झालं पण मुंबईकरांची पाण्याची चिंता अजूनही कायम

मुसळधार पाऊस झालं पण मुंबईकरांची पाण्याची चिंता अजूनही कायम

मुंबई आणि परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे..मात्र, त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता काही कमी झालेली नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रांत अद्याप दमदार पाऊस झालेला नाही.

गेल्या दोन दिवसांत सात तलावांमध्ये मिळून केवळ सहा हजार दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा वाढलाय. हा साठा मुंबईकरांसाठी अवघ्या दोन दिवसांचा आहे. दरम्यान, सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने जून महिन्यातील सरासरी गाठली आहे.

मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी जोरदार पाऊस झाला. सांताक्रूझ वेधशाळेत जून महिन्यातील पावसाची नोंद 422.2 मिलीमीटर इतकी झालीय. तर कुलाब्यामध्ये 262.6 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि डहाणूमध्येही पावसाने जूनमधील सरासरी गाठलीय. 

WebTitle : marathi news mumbai water shortage problem not yet solved thought there were heavy rainfall in last two days 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com