बोनस शेअर देण्याची WIPRO ची घोषणा

बोनस शेअर देण्याची WIPRO ची घोषणा

मुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'ने गेल्या महिन्यात बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती. कंपनीच्या शेअरधारकांनी नुकतीच  कंपनीच्या बोनस शेअरच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे  कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीचे अधिकृत भागभांडवल वाढण्यास मदत होईल, असे विप्रोने सांगितले. 

कंपनी 1:3 बोनस शेअर देणार आहे. म्हणेजच विप्रोच्या 3 शेअरवर एक शेअर बोनस मिळणार आहे. विप्रोने जानेवारीमध्ये बोनस शेअर मंजूर केला होता.  यानुसार विप्रोकडून दोन रुपये मूल्याचे 700 कोटी शेअर बोनस रूपात देण्यात येणार आहे. यामुळे विप्रोचे अधिकृत भागभांडवल 1116 कोटी रुपयांवरून 2526 कोटी रुपये होईल. डिसेंबर अखेरीस कंपनीकडे मुक्त राखीव निधी, सुरक्षित जमा ठेव आणि भांडवल राखीव निधीपोटी एकूण 46 हजार 847 कोटी रुपयांचा निधी असल्याचे कंपनीने सांगितले.सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 30 टक्क्यांनी वाढून 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. 

गेल्या दोन वर्षात कंपनीने दुसऱ्यांदा बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. वर्ष 2017 मध्ये कंपनीने एकास एक शेअर (1:1) बोनस शेअर दिला होता. शिवाय त्याचवर्षी कंपनीने 11 हजार 000 कोटी रुपयांची शेअर बायबॅक ऑफर आणली होती. 

आज मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या शेअरने 383.50 रुपयांची वर्षभरातील उच्चांकी पातळी गाठली. सध्या  मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर 1 टक्क्याने वधारून 382.6 रुपयांवर व्यवहार करतो आहे. 

Web Title: Wipro touches 52-week high on shareholders approval to issue bonus shares

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com