पुण्यात मुठा कालव्याची भिंत फुटून दांडेकर पूल भागात पाणीच पाणी.. शहरात वाहतूक कोंडी 

पुण्यात मुठा कालव्याची भिंत फुटून दांडेकर पूल भागात पाणीच पाणी.. शहरात वाहतूक कोंडी 

पुणे : पुण्यात जनता वसाहत येथे मुठा कालव्याची भिंत फुटून दांडेकर पूल भागात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे सिंहगड रस्ता, निलायम, सारसबाग, दांडेकर पुल, दत्तवाडी, टिळक रोड, नळस्टॉप आदी भागात प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली असून या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. सिंहगड रस्त्यावर पाणी शिरल्यामुळे परिसरात मोठी वाहतुक कोंडी झाली आहे.

वृद्धेश्वर घाटावर नदीकाठी अग्निशमन दल दाखल झाले असून  पाण्याचा प्रवाह थांबविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.  नागरिकांच्या घरात पाणी शिरले असुन त्यांच्या घरातील गॅस, सिलिंडर अशा अनेक वस्तू वाहून जात आहेत.  

पुण्यात जनता वसाहत येथे मुठा कालव्याची भिंत फुटून दांडेकर पूल भागात पाणीच पाणी झाले आहे. दांडेकर पुलाजवळील जनता वसाहत जनता चौकाजवळ खडकवासला धरणाचा मुठा उजवा कालवा आहे. 

कालव्यातील पाणी भराव फुटल्याने पाणी वाया जात होते. पाटबंधारे विभागाला माहिती कळविताच कालवा बंद केला. त्यामुळे कालव्यातील पाणी सिंहगड रस्त्यावर वाहत असुन रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. दांडेकर पुलाजवळील रामकृष्ण मठात, घरात, गॅरेज आणि दुकानामध्ये पाणी शिरले आहे.

WebTitle  : marathi news mutha right bank canal calamity huge traffic in half of pune 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com