नगरमध्ये दहा फूट तीन इंच लांबीचा ओडिशी कोब्रा जप्त
नगर - नगरला पकडलेल्या सर्पतस्कराने दिलेल्या माहितीवरून वन अधिकाऱ्यांनी ओडिशातून आणलेला नागराज जप्त केला. दहा फूट तीन इंच लांबीचा हा मादी साप आहे. सर्पमित्र म्हणविणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली असून, 25 तारखेपर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे.

रेल्वे पोलिसांनी चंद्रभानू नायक (वय 33, जि. बरबाड, ओडिशा) याला सापांसह पकडल्यानंतर सर्पतस्करांची साखळीच वन अधिकाऱ्यांनी उघड केली. वन विभागाने नायकसह अविनाश शहा व सोपान थोरात (रा. संगमनेर), अक्षय घोडके (रा. बार्शी), जगदीश रेवतकर (रा. चिमूर, जि. चंद्रपूर) यांना अटक केली आहे. अमर गोडांबे (रा. भोसरी, जि. पुणे) व अल्ताफ शेख (पुणे) हे दोघे फरार आहेत.
Web Title: 10 feet 3 inch odisha cobra confiscated in nagar