नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार

नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर देत ही माहिती दिली आहे.

नाणार प्रकल्प रायगडमध्ये आणण्यास स्थानिकांचा विरोध नसल्याचंही मुख्यंत्र्यांनी म्हटलं आहे. ४० गावातील ग्रामस्थांचा भूसंपादनाला विरोध नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. 

सुमारे तीन लाख कोटींचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्य़ात राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता.  दरम्यान शिवसेनेने नाणारला विरोध केला होता आणि भाजपबरोबर युती करताना हा प्रकल्प रद्द करण्याची अट घातली होती.

WebTitle : marathi news nanar oil refinery project will be shifted to raigad says CM fadanvis

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com