राणेंच्या मध्यस्थीनं नाणारचा वाद मिटला?

राणेंच्या मध्यस्थीनं नाणारचा वाद मिटला?

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातला नाणार प्रकल्पाचा वाद चिघळता-चिघळता मिटल्याचं समोर आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्या आश्वासनानंतर नाणार आंदोलकाचं अंदोलन स्थगित झाल्याचं जाहीर करण्यात आलं... 

खरंतर हा प्रश्न चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. नाणार वासीय चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी प्राणत्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्धारही केला होता. याचं कारण म्हणजे नाणार प्रकल्पाला विरोध करणा-या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांपाठोपाठ नारायण राणेंसोबत झालेली बैठकही फिस्कटली होती. 

कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध म्हणून बुधवारी कोकणातील नाणारचे रहिवासी थेट आझाद मैदानावर धडकले... नाणारच्या रिफायनरी प्रकल्पाला मुख्यमंत्री जोपर्यंत लेखी स्वपरूपात विरोध देणार नाही तोवर आम्ही मागे हटणार नाही ही भूमिका या रहिवाशीयांनी घेतली होती. अशातच नाणारच्या शिष्टमंडळाची आणि मुख्यमंत्र्यांची बैठकही झाली. मात्र यात कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे नाणार प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी मुंबईच्या आज़ाद मैदान इथं एकवटलेल्या आणि भव्य आंदोलन सुरु केलेल्या ऩाणार वासीयांनी प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत हा लढ़ा चालूच राहणार असा इशारा दिला होता. मात्र संध्याकाळी अखेर नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर  नाणार आंदोलकाच अंदोलन स्थगित करण्याचं जाहीर करण्यात आलं आणि हे आंदोलन मागे घेण्यात आलं... 

रत्नागिरीच्या जैतापूरबरोबरच राजापूरच्या नाणारविरोधात स्थानिक आक्रमक झालेत. दोन्ही प्रकल्पाला विरोध सुरू असून सरकार मात्र या दोन्ही प्रकल्प मार्गी लावण्यास उत्सुक आहे. जैतापूरमध्ये तर मोठ्या प्रमाणात काम सुरूही झालाय. त्यामुळे आता नाणार बाबत काय तोडगा निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com