Narendra Modi जगात 'एक नंबर'चे नेते; फेसबुकने जरी केली यादी

Narendra Modi जगात 'एक नंबर'चे नेते; फेसबुकने जरी केली यादी

नवी दिल्लीः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांना मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून 'नंबर वन'चे स्थान पटकावले आहे.

सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असेलेल्या फेसबुकने नुकताच अहवाल प्रसिद्ध केला आहे. या आकडेवारीवरून ही माहिती पुढे आली आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, मोदी प्रथम, डोनाल्ड ट्रम्प दुसऱया तर जॉर्डनचे सुलतान अब्दुल्लाह यांच्या पत्नी क्वीन रानिया या तिसऱया क्रमांकावर आहेत. सोशल मिडीयावर नरेंद्र मोदी यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. फेसबुकवर 'नंबर वन'चे नेते बनल्यामुळे मोदींच्या शिरपेचात आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे.

2019 वर्ल्ड लीडर ऑन फेसबुकने नुकताच अहवाल सादर केला आहे. दरवर्षी हा अहवाल सादर केला जातो. अहवालातील माहितीनुसार, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला 4.35 कोटी लाईक्स आहेत तर त्यांच्याशी जोडलेल्या इतर पेजला जवळपास 1.37 कोटी लाईक्स आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक पेजला 2.30 कोटी लाईक्स आहेत. क्वीन रानिया यांना 1.69 कोटी लाईक्स आहेत. रानिया यांचे फेसबुकसोबत ट्विटर, इंन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरदेखील खाते आहेत. एक मार्चपर्यंत फेसबुकने केलेल्या अहवालानुसार फेसबुकच्या या सर्व पेजेसला मिळून 34.50 कोटी लाईक्स आहेत. तर पेजवर टाकण्यात येणाऱ्या पोस्टवर 76.7 कोटी लाईक्स, कमेंट्स, शेअर्स आहेत. ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो फेसबुकवर सर्वाधिक वेळ घालवत असल्याचे म्हटले आहे.'

फेसबुकच्या काउंडटैंगल टूलच्या मदतीने 962 फेसबुक पेजचा सर्व्हे केला जातो, त्यामध्ये देशातील प्रमुख व्यक्ती किंवा त्यांचे सरकार यांचा समावेश असतो. जगातील राजकीय नेते, राजकीय पक्ष फेसबुक पेजच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी वापर करतात.

WebTitle : marathi news narendra modi facebook popular leader list 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com