मोदींच्या मास्टरप्लॅनसमोर पाकची दांडी गुल..  

मोदींच्या मास्टरप्लॅनसमोर पाकची दांडी गुल..  

एससीओच्या परिषदेत मोदींच्या एन्ट्रीनं असा काही धमका झाला की सारा पाकिस्तान हादरून गेलाय. दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानचा बुरखा जगासमोर फाडण्याची मोदींची रणनिती कामी येताना दिसतीय. चीन आजवर पाकिस्तानची कायम पाठराखण करत आलाय. मोदींनी हीच संधी साधत  पाकनं दहशतवादाचा रस्ता सोडावा असा सल्ला चीनला दिलाय. 

या परिषदेसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील पोहचले. पण पुलवामा हल्ल्याच्या रक्तानं माखलेल्या पाकचे हात हातात घेणंही मोदींनी टाळलं. या कृतीतून  पाकला जो काही संदेश द्यायचा होता तो मोदींनी दिला. त्यामुळे दहशतवादाच्या मुद्यावर कायम उलट्या बोंबा मारणारा पाकिस्तान मित्रराष्ट्रांच्या नजरेतूनही उतरत चाललाय. 

पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक पवित्र्यानं पाकिस्तानची नांगी ठेचली गेलीय. भारतासोबत मैत्री व्हावी यासाठी पाकिस्तान प्रत्येक संधीची वाट पाहतोय. पण कायम खोटेपणा करत आलेल्या पाकवर विश्वास ठेवायचा तरी कसा? पाकिस्तानच्या दहशतवादी चारित्र्यावर मोठा प्रहार तेव्हा झाला. जेव्हा पाकनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपली हवाई हद्द खुली केली. पण मोदी पाकच्या हवाई हद्दीतून गेलेत नाही. बिश्केकला जाण्यासाठी त्यांनी मध्य आशियाचा मार्ग निवडला. 

एकीकडे दोन्ही देशांमध्ये चर्चा व्हावी म्हणून इम्रान खान भारताला पत्र पाठवतायेत. तर दुसरीकडे दहशतवाद्यांच्या आडून अनंतनागसारखे हल्ले सुरूच आहेच. त्यामुळेच आता पाकला बायपास करण्याचा मार्ग भारतानं निवडलाय..आता हाच मार्ग पाकला त्यांच्या नापाक कर्मांची फळं देईल. 

WebTitle : marathi news narendra modis master plan against pakistan


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com