नाशकातल्या मुथुट फायनान्समध्ये सशस्त्र दरोडयाचा प्रयत्न 

नाशकातल्या मुथुट फायनान्समध्ये सशस्त्र दरोडयाचा प्रयत्न 

नाशिक शहरातील उंटवाडीत परिसरात मुथुट फायनान्सवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

सायरन वाजल्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार केला. दरम्यान या सशस्त्र दरोड्यात झालेल्या गोळीबारात एक कर्मचारी मृत्युमुखी पडलाय. मृत कर्मचारी हा मुथुट फायनान्सच्या हेड ऑफिसमधून आलेला ऑडिटर असल्याची माहिती मिळाली आहे. मृताकर्मचार्याच्या शरीरात 6 गोळ्या आढळल्या आहेत. घटनास्थळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्वत: उपस्थित राहून घटनेचा आढावा घेतलाय.

या हल्ल्यात वॉचमनसह तीन जण जखमी देखील झालेत. या हल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com