बळीराजांचा लॉन्ग मार्च पुन्हा मुंबईच्या दिशेने

बळीराजांचा लॉन्ग मार्च पुन्हा मुंबईच्या दिशेने

नाशिक : महाराष्ट्राला हक्काचे पाणी मिळावे, वनजमिनीचे पट्टे नावावर केले जावेत, कर्जमुक्ती केली जावी आणि वीजबिल माफ करावे यासाठी वर्षभरानंतर पुन्हा एकदा आज (गुरुवार) शेतकर्‍यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. राजधानी मुंबईवर आता हे 'लाल वादळ' घोंघवणार आहे.

‘लाँच मार्च’ची कूच होण्यापूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांशी खलबते सुरू केली होती. हा ‘लाँग मार्च’ मुंबईपर्यंत पोहोचणार नाही, अशा पद्धतीने प्रशासनातर्फे रणनीती आखण्यात आली आहे.

किसान सभेतर्फे शेतकरी-आदिवासींच्या प्रश्‍नांवर गेल्या वर्षी ६ ते १२ मार्च या कालावधीत नाशिकहून मुंबईला ‘लाँग मार्च’ काढण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य केल्या. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून पुन्हा एकदा सरकारला घेरण्यासाठी ‘लाँग मार्च’ काढण्यात येत असल्याचा इशारा कळवण-सुरगाणाचे आमदार जे. पी. गावित यांनी दिला. 

केंद्र सरकारने मागील साडेचार वर्षांत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक भावनिक आधारांपेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर लढवण्यात यावी, असे आव्हान ‘लाँग मार्च’च्या माध्यमातून भाजपला देण्यात येत आहे.
- हनन मुल्ला, माजी खासदार

गावित म्हणाले, की सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना झालेला नाही. शिवाय मागील ‘लाँग मार्च’वेळी २०१६-१७ पर्यंतची कर्जमाफी देण्याची मागणी मान्य करूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही.
पालकमंत्री गिरीश महाजन यांची काल सायंकाळनंतर कसरत सुरू होती; पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा बडगा उगारत, आंदोलकांना नोटिशीच्या पर्यायात अडवून ठेवण्याचे प्रशासकीय प्रयत्न सुरू होते. एकाचवेळी मुख्य वादाच्या विषयावर मौन राखत, किसान सभेचा मोर्चा माघारी फिरविण्यासाठी महाजन यांची कसरत सुरू होती.

सरकारवर दडपशाहीचा आरोप
‘लाँग मार्च’साठी शहरातील महामार्ग बसस्थानकाच्या मैदानावर आदिवासी- शेतकऱ्यांचे जथ्थे दाखल होण्यास सायंकाळपासून सुरवात झाली. घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी शहर दुमदूमून सोडले होते. पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील आदिवासी-शेतकऱ्यांना अडवून सरकारची दडपशाही चालली आहे, असा आरोप गावित यांनी केला होता.

Web Title: Thousands begin Kisan March towards Mumbai for Farmers demands

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com