लोकसभेत आझम खान यांनी मागितली माफी...

लोकसभेत आझम खान यांनी मागितली माफी...

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान पीठासीन अधिकारी रमादेवी यांना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादंग निर्माण झाल्यानंतर आज (सोमवार) अखेर माफी मागितली. लोकसभा अध्यक्षांनी दोनवेळा त्यांच्याकडून माफीनामा म्हणवून घेतला.

लोकसभेमध्ये तोंडी तलाकच्या विषयावरून सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होताना आझम खान यांची जीभ घसरली. केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या भाषणात हस्तक्षेप करणाऱ्या आझम खान यांनी "तू इधर उधर की बात ना कर' असे उद्‌गार काढले. या वेळी पीठासीन अधिकारी रमादेवी यांनीही खान यांना तुम्ही इकडे तिकडे पाहू नका आपले म्हणणे मांडा, अशा शब्दांत सुनावले. यावर आझम खान यांचा मूड अचानक शायराना झाला आणि त्यांनी रमादेवी यांना उद्देशून आक्षेपार्ह शायरी ऐकविली.

आझम खान यांच्या वक्तव्यामुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. यानंतर महिला खासदारांकडून आक्षेप नोंदविण्यात आला होता. अखेर आझमखान यांनी माफीनामा सादर केला.

Web Title: Azam Khan Apologises For Sexist Remark Against BJP Lawmaker In Parliament

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com