गुगलवर 'भिखारी' सर्च केले तर इम्रान खान दिसतोय

गुगलवर 'भिखारी' सर्च केले तर इम्रान खान दिसतोय

नवी दिल्ली : मोदी सरकारने काश्मिरमधून 370 हे कलम हटविल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. पाककडून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध व्यासपीठांवर या विरोधात भूमिका मांडली जात आहे. पण प्रत्येक ठिकाणी पाकिस्तान तोंडघशी पडत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत देखील इम्रान खानच्या हाती अपयशच आले. आता इंटरनेटच्या दुनियेत देखील इम्रान खानची खूप खिल्ली उडवली जात आहे.

इंटरनेटला गुगलवर जाऊन इम्रान खान सर्च केले तर इम्रान खान याचा कटोरा हातामध्ये घेतलेला फोटा येत आहे. या इमेजला मॉर्फ्ड करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त पण पाकिस्तानच्या पंतप्रधानाचा फोटा याठिकाणी दिसत आहे.

दरम्यान यामुळे सोशल मिडिया तसेच इतर ठिकाणी त्याची खिल्ली उडवली जात आहे. व्टिटरवर, फेसबुक, इस्टाग्राम  युझर तर सर्च रिझल्टचे फोटो शेअर करत आहेत. पाकिस्तान या बाबीला गुगलचे सीईओ सुंदर पिचई हे जबाबदार असल्याचे सांगत आहे. कारण पिचई हे भारतीय असल्याने हे हाेत असल्याचा पाकचा दावा आहे. गुगलकडून मात्र या बाबत कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.            

Web Title: google search bhikari it shows pakistan prime minister imran khan images

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com