कागदपत्रांमध्ये फेरफार केल्या प्रकरणी सिडकोच्या कंपनी सचिवांना दणका

कागदपत्रांमध्ये फेरफार केल्या प्रकरणी सिडकोच्या कंपनी सचिवांना दणका

नवी मुंबई - बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर सिडकोची कंपनी सचिव या पदाची नोकरी लाटल्याप्रकरणी प्रदीप रथ यांना वाशी दिवानी न्यायालयाने समन्स बजावले आहे. रथ यांच्यासोबत त्यांना मदत करणारे तत्कालीन कार्मिक व्यवस्थापन विभागात कार्यरत असणारे विजीन वामनन यांनाही सहआरोपी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या दोघांवर कागदपत्रांमध्ये फेरफार करून खोटी माहिती देणे, फसवणूक, अधिकाराचा गैरवापर करणे व कट केल्यामुळे फौजदारीपात्र कारवाई करण्याअंतर्गत समन्स बजावले आहे. याबाबत रथ आणि वामनन यांनी बोलण्यास नकार दिला.

सुर्वे यांना रथ यांचे प्रमाणपत्र सादर न करता सदर प्रमाणपत्र पडताळले असून ते बरोबर असल्याचे लेखी उत्तर सुर्वे यांना दिले; मात्र यावर समाधान न झालेल्या सुर्वेंनी पुन्हा अपीलात जाऊन रथ यांच्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मिळवल्या. यात रथ यांनी सिडकोकडे विधी शाखेच्या पदवीचे तात्पुरते प्रमाणपत्र सिडकोकडे सादर केल्याचे दिसून आले.

एकाच वेळी दोन ठिकाणी हजेरी?
रथ यांनी दिल्ली येथे एका कंपनीत १९९५ मध्ये कंपनी सचिव पदावर प्रशिक्षणार्थी असल्याचे पत्र सिडकोला सादर केले आहे, परंतु एप्रिल १९९६ मध्ये कट्टक येथे उत्कल विद्यापीठातून विधी शिक्षण पूर्ण केल्याचे तात्पुरते प्रमाणपत्र सिडकोला दिले आहे. या दोन्ही प्रमाणपत्रांच्या तारखांमध्ये एकाच वेळेला रथ कसे हजर राहू शकले, अशी शंका तक्रारीत सुर्वे यांनी उपस्थित केली आहे. त्‍यामुळे न्यायालयाने समन्स बजावले आहे.

Web Title: CIDCO company Secretary bump

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com