राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा शिवसेनेत; कार्यकर्त्यांसह केला शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा शिवसेनेत; कार्यकर्त्यांसह केला शिवसेनेत प्रवेश

मुंबई : शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज (बुधवार) अखेर कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

बरोरा यांनी मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला होता. यावेळी बरोरा यांच्यासोबत शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पांडुरंग बरोरा आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

पांडुरंग बरोरा हे शहापुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. 1980 पासून पवार कुटुंबासोबत पांडुरंग बरोरा यांचे वडील महादू बरोरा यांचे घनिष्ठ संबंध होते. पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. महादू बरोरा हे शहापूर मधून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

शहापुरात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपासून पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी वर नाराज असल्याचं बोललं जातं होते. याच दरम्यान ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले. शिंदे यांनी बरोरा यांचं मन वळवल्यानंतर अखेर बरोरा यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशाने शहापूरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातं आहे.

WebTitle : marathi news NCP MLA panduranga barora joins shivsena with his party workers

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com