सुप्रिया सुळे यांच्या बारामतीच्या विजयाचे बारा किलो लाडू चंद्रकांतदादांना भेट!

सुप्रिया सुळे यांच्या बारामतीच्या विजयाचे बारा किलो लाडू चंद्रकांतदादांना भेट!

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात पराभवा व्हावा, यासाठी नेटाने प्रयत्न करणारे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सुळे यांच्या विजयानिमित्त राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे बारा किलो लाडू आज भेट देण्यात आले. खुद्द चंद्रकांतदादांनी ही भेट स्वीकारली.

सुळे या काल 1 लाख 55 हजाराच्या फरकाने निवडून आल्या. त्यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा पराभव केला. भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी चंद्रकांतदादांनी जोरदार ताकद उभी केली होती. खुद्द शरद पवारांवर टीका करत बारामतीत आपला पराभव होणार, या चिंतेने पवारांना झोप येत नसावी, असा टोलाही दादांनी मारला होता. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपच्या कार्यकर्त्यांना सर्व ती रसद पुरवली होती. यात समन्वयक म्हणून पाटील यांनी काम पाहिले होते.

सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे हे आव्हान स्वीकारत त्या निवडून आल्यानंतर दादांना बारामतीचे बारा किलो लाडू भेट देण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार प्रवीण शिंदे, यशवंत ठोकळ, विशाल जाधव हे कार्यकर्ते बारा किलो लाडू घेऊन चंद्रकांतदादांच्या कोल्हापूर येथील घरी गेले.

दादांनीही त्यांचे हसत स्वागत केले. `मला शुगर आहे, त्यामुळे लाडू खात नाही, असे त्यांनी म्हटल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला. एक लाडू त्यांनी खाल्ला. `सुप्रियाताई आणि माझे संबध चांगले आहेत. पुढील महिन्यात बारामतीला येणार आहे. तेव्हा त्यांच्याकडे चहा घ्यायला येईन,`असे आश्वासहनही दादांनी या वेळी दिले.

बारामतीत येऊन पवारांवर टीका केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी चंद्रकांतदादांच्या विरोधात कोल्हापुरात जाऊन आंदोलन केले होते. आता या वेळी मिठाई देऊन आले.   

web tittle: ncp workers gift 12 kg ladu to chandrakant patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com