'चीन नसणार आता पाकड्यांच्या पाठीशी'

'चीन नसणार आता पाकड्यांच्या पाठीशी'

नवी दिल्ली- बालाकोट येथे भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला असून त्यांनी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या हल्ल्यानंतर पाकिस्तान आंतराष्ट्रीय स्तरावर एकटे पडण्याची शक्यता आहे. 

भारत, रशिया आणि चीनच्या संयुक्त आरआयसी बैठकीनंतर चीनने पाकिस्तानला इशारा देताना त्यांना असलेला पाठिंबा काढून घेतला आहे. तसेच आम्ही भारताला दहशतवाद संपविण्यासाठी मदत करू असे म्हटले आहे. त्याचबरोबर, पुलवामा हल्यानंतर चीन पाकिस्तानची सगळी मदत काढून घेण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. तसेच, पाकिस्तानची अर्थिक रसदही कमी करण्याची शक्यता आहे. 

चीनने मंगळवारी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना शांतता पाळण्याचे आवाहन करताना म्हटले होते की, दहशतवादाच्या विरोधातली लढाई आंतरराष्ट्रीय स्तरावर शातंतेच्या मार्गाने सोडवायला पाहिजे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्याच्या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी म्हटले आहे की, आम्ही संबधित सर्व बातम्या बघितल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश दक्षिण आशिया खंडातील महत्वाचे देश आहेत. दोन्ही देशात मैत्रीपूर्ण संबध कायम राहिले तर, दक्षिण आशियाच्या शांततेसाठी ते महत्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: asia china ditches pakistan for india asks pak to stop funding terror outfits

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com