चीनने सोडली पाकड्यांची साथ, दोन्ही देशांतील हवाई वाहतूक बंद

चीनने सोडली पाकड्यांची साथ, दोन्ही देशांतील हवाई वाहतूक बंद

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलिच कोंडी केली आहे. अनेरिकेनेही पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. आणि आता चीनने देखील पाकिस्तानची साथ सोडली आहे. चीन आणि पाकिस्तानमधील हवाई वाहतूक चीनकडून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच, चीनकडून पाकिस्तानला जाणारी विमानं रद्द करण्यात आली आहेत.

भारताने केलेल्या हवाई हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सुषमा स्वराज यांनी वँग यांच्याशी चर्चा केली. हल्ल्यानंतर चीनने मंगळवारी असे म्हटले होते, की भारत व पाकिस्तान यांनी संयम पाळणे आवश्यक आहे. दोन्ही देशांतील शांततापूर्ण संबंध हे दक्षिण आशियाच्या स्थिरतेसाठी महत्त्वाचे आहेत. आता चीन नेमकी पाकिस्तानबाबत काय भूमिका घेतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर चीनने पाकिसत्नानला आता दणका दिला आहे. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातल्या बालाकोट येथे एअरस्ट्राईक करुन जैश-ए-महोम्महचा तळ नष्ट केला. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. 

Web Title: China Pakistan air traffic shut down in both countries

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com