'एक दिवस मूर्ख बनवण्यासाठी 'एप्रिल फूल', आणि 5 वर्षं बनवण्यासाठी 'कमळाचं फूल'' - नवज्योत सिंग सिद्धू

'एक दिवस मूर्ख बनवण्यासाठी 'एप्रिल फूल', आणि 5 वर्षं बनवण्यासाठी 'कमळाचं फूल'' - नवज्योत सिंग सिद्धू

नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग यांनी ट्विटवरून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. सिद्धू यांच्या ट्विटनंतर भाजपनेही त्यांना ट्रोल केले आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 'कोणताही घोटाळेबाज तुरुंगात गेला नाही. कोणाकडेही काळा पैसा सापडला नाही. गंगा स्वच्छ झाली नाही. सीमेवर हुतात्मा झालेल्यांची संख्या कमी झालेली नाही. मोदी सरकार हे फक्त मोबाइलला आधार कार्ड लिंक करण्यासाठी बनवण्यात आले आहे काय? एक दिवस मूर्ख बनवण्यासाठी एप्रिल फूल, तर पाच वर्षं मूर्ख बनवण्यासाठी कमळाचं फूल!'

Navjot Singh Sidhu@sherryontopp

कोई घोटालेबाज जेल गया नहीं,
किसी के पास काला धन मिला नहीं,
गंगा साफ हुई नहीं,
सीमा पर शहादतें घटीं नहीं|
तो ये मोदी सरकार सिर्फ मोबाइल नम्बर को आधारकार्ड से लिंक कराने के लिए बनाई थी क्या ???

एक दिन मुर्ख बनाने के लिए अप्रैल फूल और पांच साल मुर्ख बनाने के लिए कमल का फूल!

10.8K

उत्तर प्रदेशमधील संत कबीरनगरमध्ये भाजप खासदार-आमदारांमध्ये झालेल्या मारहाणीचा दाखला देताना सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ट्विटरवर व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'मोदीजींची विनम्रता आणि विवेकाची परिभाषा, हीच आहे का देशाची आशा?, लोकतंत्राच्या पहिलेच ट्रोलतंत्र, लाठीतंत्र, भयतंत्र पाहिले होते. आता खासदार महोदयांनी बूटतंत्रही आणले आहे. बड़े मियां तो बड़े मियां छोटे मियां सुभान-अल्लाह!'

Navjot Singh Sidhu@sherryontopp

मोदी जी की विनम्रता और विवेक की परिभाषा,
क्या यह है देश की आशा|

लोकतन्त्र पहले ही ट्रॉलतंत्र, डंडातंत्र और भयतंत्र बन चुका,
सांसद महोदय ने अब जूता तंत्र बना दिया|

बड़े मियां तो बड़े मियां छोटे मियां सुभान-अल्लाह|

9,006

Web Title: congress leader navjot singh sidhu attacks on bjp and pm narendra modi at twitter

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com