हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिममानवच्या पावलाचे ठसे आढळल्याचा दावा, भारतीय लष्कराने ठशांचे फोटो केले ट्विट

हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिममानवच्या पावलाचे ठसे आढळल्याचा दावा, भारतीय लष्कराने ठशांचे फोटो केले ट्विट

नवी दिल्ली : लष्कराच्या गिर्यारोहक पथकाला हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिममानवाच्या म्हणजेच 'यती'च्या पावलाचे ठसे आढळल्याचा दावा भारतीय लष्कराने केला आहे. हिममानवच्या पावलांच्या ठशांचे फोटो लष्कराने ट्विट केले आहेत. यामुळे पुन्हा एकदा हिममानव खरंच आहे की नाही, याची चर्चा सुरू झाली आहे. 

For the first time, an #IndianArmy Moutaineering Expedition Team has sited Mysterious Footprints of mythical beast 'Yeti' measuring 32x15 inches close to Makalu Base Camp on 09 April 2019. This elusive snowman has only been sighted at Makalu-Barun National Park in the past. pic.twitter.com/AMD4MYIgV7

— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) April 29, 2019

लष्कराच्या गिर्यारोहक पथकाला मोहिमेदरम्यान 9 एप्रिलला मकालू बेस कॅम्पजवळ रहस्यमय पावलांचे ठसे दिसले. या ठशांचा आकार 32 X 15 इंच इतका आहे. हा ठसा मानवी पावलापेक्षा मोठा आहे, तसेच या भागातील कोणत्याच प्राण्याचे पाऊल देखील इतके मोठे नसल्याची माहिती लष्कराने दिली. तसेच सामान्य माणसाचाही या भागात फारसा वावर नाही. हा भाग नेपाळ-चीन सीमेजवळ येतो.  

यापूर्वी या भागातही हिममानव दिसल्याचे सांगितले जाते. 

Web Title: Indian Army found footprints of snowman called Yeti in Makalu Expedition

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com