अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार विविध शिष्यवृत्ती.

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जून 2019

नवी दिल्ली : पुढील पाच वर्षांमध्ये अल्पसंख्याक समाजातील पाच कोटी विद्यार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे विविध शिष्यवृत्ती देणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केली. या पाच कोटी विद्यार्थ्यांमधील 50 टक्के मुली असतील, असेही ते म्हणाले.

येथील "अंत्योदय भवना'त आयोजित केलेल्या मौलाना आझाद एज्युकेशन फौंडेशनच्या सर्वसाधारण बैठकीत नक्वी बोलत होते. "जातिवादाचे विष आणि लांगुलचालनाचे राजकारण दूर सारत मोदी सरकारने सर्वसमावेशक विकासासाठी योग्य वातावरण तयार केले आहे. आम्ही "समावेशी विकास आणि सर्वस्पर्शी विश्‍वास' निर्माण करण्यास कटिबद्ध आहोत. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना, विशेषत: मुलींना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सबल करण्यासाठी शिक्षण, रोजगार आणि सबलीकरण यांची आवश्‍यकता असल्याचे सरकारचे मानणे असून, यासाठी दहावी आधी, दहावी नंतर आणि गरीब गुणवानांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे,' असे नक्वी म्हणाले.

देशाच्या दुर्गम भागातील सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान जनविकास कार्यक्रमाअंतर्गत शाळा, महाविद्यालये, निवासी व्यवस्था उभारली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. देशभरातील मदरसांमधील शिक्षकांनाही हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि संगणकाचे प्रशिक्षण दिले जात असून, त्याद्वारे मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रचलित शिक्षण देता येईल, असे नक्वी यांनी सांगितले. 

Web Title: Modi Government provide scholarship to students of minority community

संबंधित बातम्या

Saam TV Live