शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी जमवले ५ कोटी ७५ लाख

शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी जमवले ५ कोटी ७५ लाख

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांसाठी काहीतरी करण्याची इच्छा झाली. फेसबुकच्या माध्यमातून हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबासाठी फंड रेझर सुरु केले अन् पाच दिवसांतच 5 कोटी 75 लाख रुपये जमा झाले. अमेरिकेत राहून हुतात्मा झालेल्या जवानांसाठी निधी करणाऱया युवकाचे नाव आहे विवेक पटेल.

विवेक पटेल (वय 26) हा युवक मुळचा गुजरातमधील वडोदरा येथील रहिवासी. नोकरीनिमत्त सध्या तो अमेरिकेत आहे. 'इंडिया टाइम्स' या वृत्तसंस्थेशी बोलताना विवेक पटेल म्हणाला, 'भारतीय वेबसाईट्स आंतरराष्ट्रीय कार्डच्या माध्यमातून देणगी स्वीकारली जात नसल्याने आपल्या पद्धतीने देणगी गोळा करण्यास सुरुवात केली. 'भारत के वीर' या वेबसाईटवरुन जवानांसाठी आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे माझे अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डवरून रक्कम देण्याची सोय उपलब्ध नसल्याचे दिसले. शिवाय, जास्त संख्येने लोक या साईटवर आल्याने ती सतत क्रॅश होत होती. मी माझ्यापद्धतीने या कुटुंबांसाठी मदत गोळा करण्याचा निर्णय घेतला. हुतात्मा जवानांसाठी फंड रेझर सुरु केले. फंड रेझर सुविधा सध्या भारतातील फेसबुक युझर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्या देशांमध्ये ही सुविधा आहे तेच लोक यासाठी देणगी देऊ शकतात. या फंड रेझरच्या माध्यमातून पाच लाख अमेरिकन डॉलर इतकी मदत गोळा करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. मोबाइल मेसेजेस, अॅप्लिकेशन्सवरील मेसेजेस आणि फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून 12 तासांत 2 लाख 52 हजार डॉलर म्हणजेच 1 कोटीं 79 लाखांहून अधिक रुपयांची मदत गोळा केली. पुढील चार दिवसांमध्ये 5 लाख अमेरिकन डॉलरचे उद्दीष्ट पूर्ण करत 8 लाख 4 हजार 747 डॉलर इतका निधी गोळा केला. पाच दिवसांमध्ये या फंड रेझरच्या माध्यमातून 5 कोटी 75 लाख रुपयांचा निधी गोळा झाला आहे.'

फंड रेझर सुरू केल्यानंतर मला ऑस्ट्रेलिया, कॅनडा तसेच जर्मनीमधूनही अनेकांनी फोन करुन आम्हाला भारतीय सैनिकांना मदत करायची असल्याचे सांगितले. यावरुनच केवळ सोय उपलब्ध नसल्याने इच्छा असूनही परदेशातील भारतीय नागरिकांना भारतीय सैनिकांना मदत करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येते आहे, असेही विवेकने सांगितले. फेसुबकवर विवेकने म्हटले आहे की, 'काहीही झाले तरी शेवटी आपण भारतीय आहोत. आपण कुठेही जन्माला आलो असू, कोठेही राहत असून त्याने काही फरक पडत नाही कारण शेवटी तुम्ही तुमची ओळख भारतीय अशीच करुन देता. आपण जवानांनी केलेल्या बलिदानाचे मोल पैशात मोजू शकत नाही पण त्यांच्या कुटुंबांना नक्कीच आर्थिक मदत करु शकतो.’

दरम्यान, हुतात्मा झालेल्या जवानांसाठी जमा केलेला निधी भारतामध्ये योग्य पद्धतीने येईल यासाठी विवेक प्रयत्न करत आहे. विवेक सध्या इमेलच्या माध्यमातून सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. 'सीआरपीएफ'चे डेप्युटी इन्सपेक्टर जनरल विजय कुमार म्हणाले, 'सध्या वेबसाईटवरुन आंतरराष्ट्रीय कार्डच्या माध्यमातून मदत स्वीकारता येत नसून, आम्ही पटेल यांच्याशी मेलवरुन संपर्कात आहोत. त्यांना काय मदत हवी आहे याची माहिती घेऊन आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत. क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून गोळा झालेला हा मदतनिधी योग्य पद्धतीने भारतात यावा यासाठी योग्य तो निर्णय घेऊ.'

विवेकच्या मोहिमेनेतर शिकागोमधील देसी जंक्शन या रेडिओ चॅनेलनेही या मोहिमेला पाठिंबा देणारी पोस्ट आपल्या फेसबुकवरुन केली आहे. शिकागोमधील भारतीय वकिलाती तसेच भारतीय संरक्षण दल आणि परराष्ट्र मंत्रालयाला या उपक्रमाची माहिती देण्यात आल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title:Pulwama Terror Attack : Vivek Patel indian residing in us has raised over rs 5 crore for pulwama martyrs kin

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com