'न्यू इंडिया'चे पाऊल पाच ट्रिलियन डॉलरच्या दिशेने!

 'न्यू इंडिया'चे पाऊल पाच ट्रिलियन डॉलरच्या दिशेने!

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साकारण्याची रूपरेषा समोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) अर्थसंकल्प सादर केला.

आर्थिक आघाडीवरील सरकारच्या कामकाजाचा मागील वर्षभरातील लेखाजोखा मांडणारा आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेला सादर केला. या अहवालातील निष्कर्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्‌विटद्वारे समाधान व्यक्त केले होते. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपतींकडे अर्थसंकल्प सुपूर्द केल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. तसेच अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री आहेत.

'यंदाची निवडणूक ही आम्हाला विश्वास देणारी ठरली. नागरिकांनी आम्हाला न्यू इंडिया करण्यासाठी मतदान केले. काम करणारे सरकार अशी आमची ओळख झाली आणि त्याला नागरिकांनी पसंती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची कार्यशैली नागरिकांना आवडली. गेल्या पाच वर्षांत न्यू इंडियासाठी कार्य सुरु केले असून, तेच पुढे जाईल,' असे मत अर्थमंत्री सितारामन यांनी मांडले. 

अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये

  • पुढील काही वर्षांत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे आमचे लक्ष्य आहे
  • पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनी चांगले सरकार निवडले
  • भारतातल्या शेवटच्या माणसापर्यंत आम्ही केलेले काम पोहचले आहे
  • मजबूत देशासाठी, मजबूत नागरिक हे आमचे लक्ष्य
  • अन्न सुरक्षेवर आमच्या सरकारचा भर
  • मेक इन इंडियावर सरकारचा भर
  • मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही लक्ष्य साध्य करू
  • चीन आणि अमेरिकेनंतर भारताची अर्थव्यवस्थेची वाटचाल सुरु आहे
  • आशा, विकास आणि आकांक्षा यावर नागरिकांचा विश्वास आहे
  • विविध प्रकल्पांमधील सार्वजनिक गुंतवणूक वाढविणार
  • गेल्या पाच वर्षांत कायापालट करणारे प्रकल्प केले
  • देशातील खासगी उद्योगांची विकासात मोलाची भूमिका
  • मुद्रा कर्ज योजनेमुळे अनेकांचे आयुष्य बदलले
  • डिजीटल इंडियाचा लाभ संपूर्ण भारताला झाला
  • 2014 ते 2019 पर्यंत खाद्य सुरक्षेवर भर दिला
  • सागरमाला प्रकल्पामुळे जलमार्गांचा विकास होणार
  • पायाभूत सुविधांमधून दळणवळण वाढविण्याचा प्रय़त्न
  • पायाभूत सुविधांच्या विकासामुळे वाहतूक खर्च कमी झाला
  • हवाई क्षेत्रात भारताला विकासाची मोठी संधी
  • प्रदुषणमुक्त देश निर्माण करण्याचे लक्ष्य
  • भारताची अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर 
  • लालफितींचा कारभार कमी करणार
  • तरुणांच्या हाताला काम देण्याचे सराकरचे लक्ष्य
  • मेक इन इंडियाचा जगभरात डंका आहे
  • शहर आणि गावातील दरी दूर करणार
  • 300 किलोमीटर मेट्रो मार्गाला सरकारकडून मंजुरी
  • वेगाने विकासासाठी सार्वजनिक भागीदारी गरजेची
  • एक देश एक ग्रीड हे आमचे लक्ष्य
  • एक देश, एक ग्रीडमधून सर्वांना वीज पुरविणार
  • नवे औद्योगिक कॉरिडोर उभारणार
  • सागरमाला योजनेतून नव्या बंदरांचा विकास करणार
  • इलेक्ट्रिट वाहनांना विशेष सूट देण्याची सरकारची योजना
  • पाणी आणि गॅससाठी राष्ट्रीय ग्रीड उभारणार
  • सर्वांना वीज देण्याचे सरकारचे ध्येय
  • चुलीच्या धुरापासून ग्रामीण भागाला मुक्त करणार
  • गुंतवणूक आधारित विकास वाढविण्यावर भर 
  • पेन्शन योजनेचा 3 कोटी छोट्या व्यावसायिकांना फायदा होईल
  • छोट्या व्यावसायिकांसाठी सरकारची मोठी योजना
  • छोट्या व मध्यम व्यावसायिकांसाठी 59 मिनिटांत कर्ज उपलब्ध
  • पंतप्रधान कर्मयोगी मानदंड योजनेचा व्यावसायिकांना लाभ होणार
  • सरकारी जमिनींवर घरांची योजना राबविणार
  • भाडेकरारासंदर्भात नवे नियम आणणार, प्रत्येकाला घर यासाठी प्रय़त्नशील
  • रेल्वेत सार्वजनिक व खासगी गुंतवणुकीला भार देणार
  • रेल्वेची 50 लाख कोटींची गरज
  • वर्षाला 20 लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्
  • परकी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारचे प्रयत्न
  • परकी गुंतवणुकीला जगात खराब चित्र असताना भारतात चांगले चित्र
  • एखाद्या कंपनीत परकी गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्यात येणार
  • विमा, माध्यम, हवाई क्षेत्रात परकी गुंतवणूक वाढविणार
  • परकी गुंतवणुकीत भारताला जगातील फेव्हरेट नेशन बनविणार
  • विमा क्षेत्रात 100 टक्के परकी गुंतवणुकीवर भर
  • अंतराळ क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली आहे
  • लाँच व्हेईकल क्षेत्रातही आपण प्रगत झालो आहे
  • ग्रामीण क्षेत्र हा भारताचा आत्मा आहे
  • उज्ज्वला आणि सौभाग्य योजना या ग्रामीण भागासाठी आम्ही आणल्या
  • उज्ज्वला योजनेतून सात कोटी नागरिकांना गॅस कनेक्शन दिले आहेत
  • गावातील प्रत्येक घरात एलपीजी कनेक्शन मिळाले आहे
  • प्रत्येकाला घर देण्याची सरकारची योजना आहे
  • प्रत्येक घरात गॅस कनेक्शन, वीज सुविधा असेल
  • यापूर्वी घर बांधण्यासाठी 314 दिवस लागत होते, आता 114 दिवसांत घर पूर्ण होत आहे
  • 133 ते 135 किमी रस्ते रोज पूर्ण करण्यात येत आहे
  • 30 हजार किमीचे रस्ते बनविण्यासाठी हरित गोष्टींचा वापर
  • येत्या पाच वर्षांत 1 लाख 25 हजार किमीचे रस्ते बनविण्यात येणार
  • 2022 पर्यंत 1.95 कोटी नागरिकांना घरे देणार
  • पारंपारिक उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड देण्यात येईल
  • कृषी उद्योगासह दूध व्यवसायाला चालना देण्यात येईल
  • डाळींच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण होण्यासाठी देशाचा प्रयत्न
  • दूध उप्तापदांच्या विक्रीसाठी नव्या योजना आणणार
  • अन्नदात्याला उर्जादाता बनविण्यावर भर देण्यात येईल
  • पिण्याच्या पाण्याच्या योग्य नियोजनासाठी मंत्रालयाची स्थापना 
  • प्रत्येक घरात पाणी ही राज्य सरकारच्या माध्यामातून योजना
  • जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरात योजना राबविणार (रेनवॉटर हार्वेस्टिंग)
  • हर घर नल, हर घर जल ही योजना राबविणार

Web Title: Union Finance Minister Nirmala Sitharaman presents union budget in Parliament

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com