नरेंद्र मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर , निर्मला सीतारामन देशाच्या नव्या अर्थमंत्री

नरेंद्र मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर , निर्मला सीतारामन देशाच्या नव्या अर्थमंत्री

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर झाले असून निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. देशाच्या पहिल्या स्वतंत्र महिला संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी तडफदारपणे संरक्षण विभागाचे कामकाज बघितले आहे. 

‘रत्नपारखी’ असलेल्या नरेंद्र मोदींनी संसदेच्या सदस्यही नसलेल्या सीतारामन यांना कंपनी व्यवहार आणि वाणिज्यमंत्री करून सर्वांना धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा त्यांना अर्थमंत्रीपद देऊन सगळ्यांना धक्का दिला आहे. वर्ष 1970 ते 1971 दरम्यान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्री म्हणून काम बघितला होता. आता जवळपास 48 वर्षानंतर पुन्हा एकदा एका महिलेकडे अर्थमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. 

मूळच्या मदुराईच्या असणाऱ्या सीतारामन यांनी भारत व युरोप यांच्यातील व्यापारसंबंधांवर जेएनयूतुन डॉक्टरेट पूर्ण केले आहे. त्या आधीपासून भाजपसमर्थक असल्या तरी ते 2008मध्ये त्यांनी पक्षात औपचारिक प्रवेश केला. ज्येष्ठ नेत्यांच्या प्रोत्साहनाने पक्षप्रवक्तेपद सांभाळणारा एक दाक्षिणात्य चेहरा म्हणून सीतारामन यांची ओळख आहेच.  गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर राज्यात परतल्यानंतर संरक्षण खात्याची जबाबदारी  सीतारामन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. 

Web Title: Nirmala Sitharaman is the new finance minister

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com