पाकिस्तानचा आणखी एक खोटारडेपणा; हाफिज, मसूदवर ठोस कारवाई नाहीच 

पाकिस्तानचा आणखी एक खोटारडेपणा; हाफिज, मसूदवर ठोस कारवाई नाहीच 

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आणि साऱ्या जगात पाकची छी थू झाली. जगाच्या नजरेत आपली प्रतिमा सुधारण्यासाठी पाकनं दहशतवादाविरोधात कारवाईचं ठोस आश्वासन दिलं. इथं वास्तव्यास असलेले दहशतवाद्यांचे म्होरके हाफिज सईद, अझहर मसूद यांच्या टोळ्यांची आर्थिक नाकेबंदी केली. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचा आवही पाकिस्ताननं आणला.

 पाकिस्तानच्या या खोट्या कारवाया पुन्हा एकदा बेनकाब झाल्यायेत. हाफिज आणि मसूद अजहर विरोधात केवळ कारवाईचा देखावा सुरू असल्याचं जगाच्या लक्षात आलंय. त्यावरूनच अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. फ्लोरिडात सुरू असलेल्या फायनँशियल एक्शन टास्क फोर्सच्या बैठकीत पाकिस्तानच्या या दुटप्पी धोरणावर जोरदा चर्चा झाली. 

लश्कर-ए-तैयबा, जैश-ए- मोहम्मद, जमात-उद-दावा आणि फलह-ए-इंसानियत या संघटनांची 700 हून अधिक मालमत्ता जप्त केल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय. दहशतवादी कारवायांमुळे या संघटनांच्या सदस्यांना अटक केल्याचंही पाकिस्ताननं म्हंटलंय. मात्र प्रत्यक्षात या सदस्यांवर दहशतवादाचे गुन्हे दाखल नाहीत. इतकच नाहीत तर हाफिज सईद, मसूद अजहर या वॉन्टेड दहशतवाद्यांवरही पाकिस्तान सरकारनं गुन्हे दाखल केलेले नाहीत. 

पाकिस्तानच्या या खोटारटेपणावर युरोपीय देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. याचे पडसाद फायनँशियल एक्शन टास्क फोर्सच्या बैठकीतदेखील उमटलेत. त्यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मिळण्याची अशा पुन्हा एकदा धुसर झाली. 

आर्थिक अराजकतेमुळे पाकिस्तानमध्ये महागाईचा भस्मासूर माजलाय. तरीही पाकिस्ताननं दहशदवाद्यांविरोधात कडक पावलं उचललेली दिसून येत नाहीत. पाकची ही भूमिका म्हणजे कुत्र्याच्या वाकड्या शेपटीसारखीच म्हणावी लागेल. 

WebTitle : marathi news no action yet taken on hafiz and masood azhar by pakistan 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com