उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात बुधवारी गारपीट होण्याचा अंदाज 

FILE PHOTO
FILE PHOTO

उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात बुधवारी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दक्षिणपूर्व अरबी समुद्रात केरळ ते महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बुधवारी 7 मार्चला उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात विजांच्या गडगडाटासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या महिन्यात 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान मराठवाडा, विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती.. यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. त्यातच उत्तर प्रदेशमधील मथुरेपासून बुलंदशहरपर्यंत, अनेक भागात गारपिटीसह जोरदार पाऊस पडला आहे. 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com