अबब...ओला, उबरचा प्रवास विमानापेक्षा महाग

अबब...ओला, उबरचा प्रवास विमानापेक्षा महाग

मुंबई - ओला, उबर या ऍप्लिकेशन बेस्ड टॅक्‍सीच्या भाड्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. काळी पिवळी टॅक्‍सी, रिक्षांच्या भाड्यावर नियंत्रण असले, तरी प्रत्यक्षात विमान प्रवास या सर्व पर्यायांपेक्षा स्वस्त आहे. मुंबई-दिल्ली या विमान प्रवासासाठी प्रत्येक किलोमीटरला साधारणत- आठ ते सव्वा आठ रुपये तिकीट पडते; मात्र रिक्षाचे भाडे प्रतिकिलोमीटरला 12 रुपये आहे. ओला, उबरचे किमान भाडे 18 ते 20 रुपयांपासून सुरू होऊन गरजेच्या वेळी ते 30 ते 35 रुपयांपर्यंतही असते. 

रिक्षा आणि काळी पिवळी टॅक्‍सीचे भाडे राज्याच्या परिवहन विभागामार्फत निश्‍चित केले जाते. त्यासाठी काही वर्षांपूर्वी आयोगही नेमण्यात आला होता; मात्र ओला, उबरच्या भाड्यावर नियंत्रणासाठी कोणतेही धोरण अस्तित्वात नाही. ओला, उबरवर सरकारी नियंत्रण आणण्यासाठी धोरण तयार करण्यात आले; मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 

दृष्टिक्षेपात भाडे 
रिक्षा - किमान 1.5 किलोमीटरसाठी 18 रुपये; पुढे प्रत्येक 100 मीटरसाठी 1.20 रुपया 
टॅक्‍सी - किमान 1.5 किलोमीटरसाठी 22 रुपये; पुढे प्रत्येक 100 मीटरसाठी 1.50 रुपया 
ओला - सामान्य वेळी प्रत्येक किलोमीटरसाठी 19 रुपये 
उबर - सामान्य वेळी प्रत्येक किलोमीटरसाठी 20 रुपये 

ओला-उबर या ऍप बेस्ड वाहतूक सेवेसाठी 40 पानांची नियमावली परिवहन विभागाने तयार केली; मात्र त्याविरोधात ओला-उबरने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने कारवाईला स्थगिती दिली आहे. 
- प्रकाश साबळे, उपसचिव, परिवहन विभाग 

राज्य सरकारने प्रवाशांच्या सोईसाठी सर्व वाहतूकसेवा कायद्यांतर्गत आणल्या पाहिजेत. सध्या मेट्रो, मोनोनंतर आता ई-वाहतूकसुद्धा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सर्व प्रवासी वाहतुकीत स्पर्धा कशी निर्माण करता येईल, याचा विचार व्हायला पाहिजे. त्यानंतरच प्रवाशांचे हित लक्षात घेतले पाहिजे. 
- वर्षा राऊत, सदस्य, मुंबई ग्राहक पंचायत 

ओला, उबरचे काही चालक अनेक वेळा मोबाईल ऍपद्वारे निश्‍चित झालेल्या भाड्यापेक्षा जास्त भाड्याची मागणी करतात. त्यातही महत्त्वाचे म्हणजे इच्छितस्थळ दूर असल्यास भाडेही नाकारले जाते. त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. 
- गौरव जाधव, प्रवासी 

Web Title: Ola and uber travel is expensive

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com