संभाजी भिडे यांच्यावरील 2008 मधील जुने गुन्हे मागे; 'कोरेगाव भीमा' प्रकरण कायम!

संभाजी भिडे यांच्यावरील 2008 मधील जुने गुन्हे मागे; 'कोरेगाव भीमा' प्रकरण कायम!

पुणे- शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावरील कोरेगाव भीमाचा नव्हे तर 2008 मधील जुने गुन्हे काढून टाकण्यात आले आहेत अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. कोरेगाव भीमा प्रकरणातील गुन्हा हा कायम ठेवण्यात आल्याचे स्पष्टीकरणही पोलिसांकडून देण्यात आले आहे.

संभाजी भिडे यांच्यावरील कोरेगाव भीमाचा नव्हे तर 2008 मधील एक जुना गुन्हा काढून टाकण्यात आला आहे. मागे घेतलेला गुन्हा हा मिरजेतील दंगलीचा आहे. पुरावा नसल्यामुळे हा गुन्हा मागे घेतला आहे, असा पोलिसांचा दावा आहे. सार्वजनिक मालमत्तेची हानी, आंदोलने आदींबाबतचे गुन्हे अनेकदा मागे घेतले जातात, त्या नुसार हे रूटीन आहे, असे पोलिस सांगत आहेत. तसेच, 2008 साली जोधा अकबर चित्रपटाला विरोध करताना संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी मालमत्तेची नासधूस केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते तेही गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. संभाजी भिडे यांच्यावरील जवळपास 6 गुन्हे मागे घेतल्याची माहिती आहे.  

दरम्यान कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यावरील विरोधातील दंगलीचे सहा गुन्हे मागे घेण्यात आले आहेत अशी माहिती होती. माहिती अधिकारातून ही बाब समोर आल्याचा दावा केला जात आहे. सरकारने शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यां विरोधात दाखल झालेले गुन्हेसुद्धा मागे घेतले आहेत. माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने या संदर्भात एकूण आठ परिपत्रक जारी केली आहेत.

एक जानेवारीला कोरेगाव-भीमामध्ये झालेल्या हिंसाचारा प्रकरणी पुणे पोलिसांनी 10 सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने संभाजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर या हिंसाचाराचा ठपका ठेवला होता. या प्रकरणात पुणे पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनीही संभाजी भिडे आणि इतरांवर दाखल झालेले गुन्हे अद्याप मागे घेतलेले नसल्याची माहिती दिली आहे.

Web Title: The charge against Sambhaji Bhide is Revoked but still koregoan Bhima


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com