OMPEX18 ब्रिटनमधील पाहिलं-वहिलं निवासी मराठी उद्दोजकांचं प्रदर्शन

OMPEX18 ब्रिटनमधील पाहिलं-वहिलं निवासी मराठी उद्दोजकांचं प्रदर्शन

अनिवासीय महाराष्ट्रीयन व्यावासियायिक आणि उद्योजक समूह म्हणजेच OMPEG तर्फे शनिवार ,२७ ऑक्टोबर २०१८ रोजी OMPEX18 हे ब्रिटनमधील पाहिलं-वाहिलं निवासी मराठी उद्दोजकांचं प्रदर्शन स्लोव या शहरात पार पडलं.

या प्रदर्शनाचा मुख्य हेतू हा अनिवासी महाराष्ट्रीयन व्यावासियायिक आणि उद्योजक यांच्यासाठी नवीन व्यवसायाच्या संधी, त्याचबरोबर व्यावसायिकांचे जाळं तयार करणं हा होता. स्लोव मित्र मंडळ, महाराष्ट्र मंडळ, लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन केले गेलं होतं. 

OMPEX18 चं उदघाटन   राहुल नांगरे (First Secretary,Trade) यांच्या हस्ते पार पडलं. राहुल नांगरे यांनी उपस्थित व्यावसायिकांना बहुमुल्य मार्गदर्शन केलं. त्याचसोबत सर्व उद्योजकांसोबत भारतीय उच्चायुक्त कार्यालय खंबीरपणे उभं राहील असं आश्वासन त्यांनी दिलंय. 

OMPEG या समूहाशी गेल्या २ वर्षात १२० पेक्षा जास्त अनिवासीय महाराष्ट्रीयन व्यावासियायिक आणि उद्योजक जोडले गेले आहेत. OMPEX18 व्यवसाय प्रदर्शनात २५ पेक्षा जास्त उद्योगांनी गृह सुरक्षा, वास्तू रचना, संगणकीय सेवा, खाद्यपदार्थ, संतुलित आहार, तयार कपडे, सौंदर्य स्पर्धा, कर आणि कायदेशीर सल्ला इत्यादी वस्तू आणि सेवा प्रदर्शित केल्या गेल्यात. 

OMPEX18 प्रदर्शनाला स्लोव, रिडींग, ब्रॅकनेल, लंडन आणि सभोतालच्या शहरांमधील शेकडो लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला. प्रदर्शनासाठी अनेकजण  लंडन, ब्रार्मिंगहॅम, मँचेस्टरमधूनही आल्यामुळे व्यायसायिकांचा उत्साह द्विगुणीत  झाला होता.  

प्रदर्शनातील विशेष बाब 

या प्रदर्शनातील विशेष बाब म्हणजे या प्रदर्शनातील  एकूण २५ स्टॉल्स  पैकी ८ स्टॉल्स हे महिला उद्योजकांचे होते. 

तज्ज्ञांचं  विशेष मार्गदर्शन

OMPEG  समुहामधील तज्ज्ञांची विशेष मार्गदर्शन सत्रं या प्रदर्शनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. यात  आर्थिक वृद्धी, व्यावसायिक वृत्ती या विषयावर तज्ज्ञ अनिरुद्ध कापरेकर, सुशील रापतवार, रेश्मा देशपांडे आणि डॉक्टर महादेव भिडे यांनी ८० पेक्षा अधिक व्यवसायोच्छुकांना उपयुक्त माहिती आणि सूचना दिल्या. 

महाराष्ट्रीयन समूहामध्ये नवचैतन्याचं वातावरण

OMPEX18 च्या माध्यमातून ब्रिटनमधल्या निवासी महाराष्ट्रीयन समूहामध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण होत असून अनेक नवीन व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रामध्ये प्रवेश करू पाहणाऱ्यांची OMPEGशी निगडित होण्याचा निर्णय याप्रसंगी निश्चित केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com