उघड्या जीवघेण्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाचे सुरक्षेचे दावे पुन्हा फोल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 जून 2018

कुर्ल्यात मॅनहोलमध्ये पडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा उघड्या जीवघेण्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी पोटविकार तज्ज्ञ डॉ.अमरापूरकर यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता.

तर, यंदा 7 जून रोजी ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प परिसरातील नाल्यात पडून एका अडीच वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. घरासमोर खेळत असताना ही दुर्घटना घडली. पालिकेच्या कर्मचाऱयांनी त्याला बाहेर काढून शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याचा तत्पूर्वीच मृत्यू झाला.

कुर्ला येथील इस्टर्न एक्स्प्रेस-वे परिसरातील मॅनहोलमध्ये पडून 22 जून रोजी रात्री 11.30वा. एका अज्ञात व्यक्तीचा बुडून मृत्यू झालाय. तर मुंबईत साम टीव्ही वृत्तवाहिनीच्या गाडीचं चाक उघड्या मॅनहोलमध्ये अडकल्याने, मुंबई प्रशासनाचे सुरक्षेचे दावे पुन्हा फोल ठरत असल्याचं जळजळीत वास्तव समोर आलं आहे. 

संबंधित बातम्या