जम्मू-काश्मीरमध्ये खाद्य पदार्थ नेले जाऊ शकतात, तर मल्टीप्लेक्समध्ये बंदी कशाला - हायकोर्ट

जम्मू-काश्मीरमध्ये खाद्य पदार्थ नेले जाऊ शकतात, तर मल्टीप्लेक्समध्ये बंदी कशाला - हायकोर्ट

मुंबई - जम्मू-काश्मीर मध्ये खाद्य पदार्थ नेले जाऊ शकतात, मग इथे मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेण्यावर बंदी कशाला, कोणती सुरक्षा सरकार म्हणते आहे, त्या सुरक्षेला आधार काय आहे असं म्हणत हायकोर्टाने हायकोर्टचे राज्य सरकार आणि मल्टिप्लेक्स संघटनेला फटकारलंय. सिनेमागृहात खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्याच्या याचिकेवरील सुनावणीवर कोर्टाचे हे प्रश्न उपस्थित केले आहेत.

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्याच्या मुद्यावरुन राज्य सरकारने घूमजाव केलं होतं. मल्टिप्लेक्समध्ये सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरील खाद्यपदार्थ सिनेमाघरात नेण्यावरील बंदी कायम ठेवत असल्याचं राज्य सरकारने सांगितलं होतं.  राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला गेला होता. त्याचप्रमाणे,  महाराष्ट्र पोलिस ऍक्टनुसार सिनेमागृहात खाद्यपदार्थ चढ्या दरात विकल्याबद्दल कारवाई करण्याची कोणतीही तरतूद नसल्याचं सरकारने सांगितलं. 

दरम्यान, ल्टिप्लेक्स संघटनेने सरकारसोबत कितीची सेटलमेंट केली?,  असा सवाल मनसे नेते विचारताना पाहायला मिळतायत. 

WebTitle : marathi news outside food not allowed in multiplexes  highcourt state government 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com