पाकड्यांचा फडतूसपणा; अभिनंदन प्रकरणी बनवली आक्षेपार्ह जाहिरात

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 जून 2019

भारत आणि पाकिस्तानदरम्यान येत्या 16 तारखेला वर्ल्डकपमध्ये हायव्होलजेट मॅच होणार आहे. भारत-पाकिस्तानमधील क्रिकेटरसिकांसह जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याबाबत उत्सुकता असते. या सामन्यापूर्वीच पाकिस्तानमधल्या एका चॅनेलनं भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन प्रकरणाचा आधार घेत आक्षेपार्ह जाहिरात तयार केलीय. 

पाकच्या विमानाच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांचा वापर जाहिरातीत करण्यात आलाय. यंदाचा वर्ल्डकप आमचाच असेल, असा संदेश देणारी आक्षेपार्ह जाहिरात पाकिस्तानमधील वाहिनीनं तयार केलीये. यामध्ये विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती चहा पिताना दाखवण्यात आलीये.

खरं तर अशा जाहिराती करुन वर्ल्ड कप जिंकता येत नाही तर त्यासाठी खेळही तितकाच तगडा खेळावा लागतो. मात्र पाकिस्तानला कोण सांगणार. विशेष म्हणजे भारतानं यापूर्वी वर्ल्डकपमध्ये सहा वेळा धूळ चारलीय. पाकच्या या उद्दामपणाला टीम इंडिया मैदानातच आपल्या खेळातूनच सडेतोड उत्तर देऊन पाकची मस्ती उतरवणार यात शंका नाही.

WebTitle : marathi news Pakistan made objectionable ad on Indian wing commander abhinandan

संबंधित बातम्या

Saam TV Live