Loksabha 2019 : शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपकडून डच्चू

Loksabha 2019 : शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपकडून डच्चू

पाटणा : बिहारमध्ये भाजपने राष्ट्रीय जनता दलासह असलेल्या युतीच्या 40 उमेदवारांची आज (शनिवार) घोषणा केली. महत्त्वाचे म्हणजे भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात सभा होत असून, त्यानंतर पश्चिम बंगालमधील माल्दा येथे सभा होणार आहे. त्यापूर्वीच एनडीएने बिहारमधील 40 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पाटणासाहेब मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, पाटलीपुत्रमधून रामकृपाल यादव आणि बेगुसरायमधून गिरीराजसिंह यांना उमेदवारी दिली आहे. पाटणासाहेब मतदारसंघात यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा हे उमेदवार होते. सतत पक्षविरोधी वक्तव्यांमुळे सिन्हांना उमेदवारी नाकारल्याचे बोलले जात आहे.

भाजपने शुक्रवारी मध्यरात्री आपली तिसरी यादी जाहीर केली होती. यामध्ये 36 उमेदवारांची घोषणा करताना संबित पात्रा यांना ओडिशातील पुरी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांच्या अन्य काही पक्षांची युती असून, तेथे काँग्रेस आणि राजद यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. 

Web Title: BJP drops sitting Patna Sahib MP Shatrugan Sinha fields Ravi Shankar prasad in Bihar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com