पावना धरणात अडीच टीएमसी पाणीसाठा; पिंपरी चिंचवडमध्ये पाणीकपात वाढणार

पावना धरणात अडीच टीएमसी पाणीसाठा; पिंपरी चिंचवडमध्ये पाणीकपात वाढणार

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पावना धरणात अडीच टीएमसी पाणीसाठा राहिल्याने शहरात आणखी पाणीकपात होण्याची शक्यता आहे.

सध्या आठवड्यातून एक दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. मात्र, कमी होत चाललेली धरणाची पातळी पाहता दिवसआड  पाणी शहरवासियांना देण्याची पाळी येणार आहे. अथवा दररोजच्या पाणी पुरवठ्यात कपात करावी लागेल.परिणामी शहरात अगोदरच काही सोसायट्यांना टँकरने पाणी द्यावे लागते आहे. त्यात आणखी भर पडणार आहे.

पवनाची साठवणक्षमता ८.५१ टीएमसी आहे. २ मे पर्यंत त्यात  २.५२ टीएमसी पाणी राहिलेले  आहे गतवर्षी ते या कालावधीपर्यंत ३.१८ टीएमसी होते. आजचा पाणीसाठा हा २५ जूनपर्यंत पुरेल एवढा असल्याचे पवनाचे उप अभियंता ए.एम.गडवाल यांनी सांगितले. दुसरीकडे पावसाला खरी सुरुवात आणि धरणात पाणीसाठा होण्यास जुलै मध्ये सुरुवात होते. त्यामुळे जुलैपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक संपताच जसे पुण्याचे पाणी आठवड्यातून एकदा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. तसा तो पिंपरी चिंचवडमध्ये अगोदरच घेण्यात आला आहे आता त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. एकतर, ते दिवसाआड करावे लागेल वा दररोज १०ते वीस टक्के कमी पाणी द्यावे लागणार आहे. दुसरीकडे पाणीवापराबाबत अजून पुरेशी जागरूकता आणि त्याचे गांभीर्य नाही बांधकामाला पिण्याचेच पाणी वापरले जात आहे. वॉशिंग सेंटर सुरु आहेत. पाण्याचा काटकसरीने वापरच होत नसल्याचे चित्र आहे 

गतवर्षी ऑगस्टमध्ये पवना भरले. त्यामुळे पाणी सोडण्यात आले. मात्र नंतर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पाऊसच झाला नाही. त्यामुळे पाणीसाठा कमी राहिला, असे गढवाल म्हणाले.

Web Title: marathi news pawana dam left with two and half tmc water water cut in pimpri chinchwad 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com