आज पेट्रोल 21 तर डिझेल 31 पैशांनी महागलं

आज पेट्रोल 21 तर डिझेल 31 पैशांनी महागलं

तीन दिवसांपूर्वी सरकारने इंधन दरकपातीची घोषणा करत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला खरा मात्र, दरवाढ रोखण्यात सरकारला सातत्याने अपयशच येतय. आजही पेट्रोल-डिझेल दराचा पुन्हा भडका उडालाय. आज पेट्रोल 21 तर डिझेल 31 पैशांनी महागलंय.  आज मुंबईत पेट्रोल 87.50 रुपयांवर पोहोचलंय तर प्रतिलिटर डिझेलसाठी 77.37 रुपये मोजावे लागतायत.  

गेल्या तीन दिवसात पेट्रोल 53 पैशांनी भडकलंय तर दोन दिवसात डिझेलच्या दरांमध्ये 63 पैशांची वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असून ऑगस्टपासून सातत्याने दरवाढ सुरु आहे. घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येतो आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात दररोज कच्च्या तेलाचे दर वाढत असल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

WebTitle : marathi news petrol diesel price hike continues 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com