पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 13 पैशांची वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा इंधन दरवाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 13 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलचा दर 90.35 रुपयांवर पोहोचला आहे.

तर, डिझेलसाठी आज मुंबईकरांना 78.82 रुपये मोजावे लागतील. सततच्या दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली आहे. मात्र अद्याप सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा दिलेला नाही. 

राज्यासह देशभरात दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानं माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे भाजीपाल्यांसह सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात इंधनाचे दर चांगलेच भडकले आहेत.

आतापर्यंत फक्त 29 मे ते 5 जुलैदरम्यान दरात घसरण झाली होती... त्यानंतर 6 जुलै ते 25 सप्टेंबरदरम्यान बहुतांश दिवस इंधनाचे दर वाढले. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने देशांतर्गत इंधन महाग होत आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live