पेट्रोल-डिझेल दराचा पुन्हा भडका उडाला 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

इंधन दरकपातीच्या सरकारच्या घोषणेला 48 तास होत नाही तोच, पेट्रोल-डिझेल दराचा पुन्हा भडका उडाला आहे.

आज पेट्रोल 14 तर डिझेल 31 पैशांनी भडकले आहे. आज मुंबईत पेट्रोल 87.29 रुपयांवर पोहोचलं असून.

प्रतिलिटर डिझेलसाठी 77.06 रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या दोन दिवसात पेट्रोल 32 पैशांनी भडकले आहे. राज्यासह देशभरात दररोज इंधनाचे दर वाढतायत.

ऑगस्ट महिन्यापासून सातत्याने ही दरवाढ सुरुच आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. सातत्याने घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येतो आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात दररोज कच्च्या तेलाचे दर वाढत असल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live